आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रिमझिम पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने ज्या ठिकाणी उंच सखल भाग आहे. तसेच, माती साचलेली आहे, अशा ठिकाणी चिखल पाणी अन्् खड्डा मोठा झाल्याने सोमवारी सायंकाळी पाच वाजेपासून झालेली वाहतूक कोंडी मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आस्ते कदम सुरूच होती. जवळपास १५ किमी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगांच रांगा होत्या. राष्ट्रीय महामार्ग ५२ चे काम प्रगतिपथावर आहे. ज्या ठिकाणी पुलाचे काम किंवा चेकपोस्टचे काम सुरू असलेला पट्टा वगळून इतर कामे वेगात सुरू आहेत. मात्र, ज्या ठिकाणी काम बाकी आहे तेथे पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्याचे रूपांतर डबक्यात झाले.
वाहनांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक सुरळीत होण्यास विलंब
सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वाहतूक हळूहळू सुरळीत होण्यास सुरुवात झाली. दरम्यान, चारचाकी छोट्या वाहनांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक सुरळीत होण्यास विलंब झाल्याचे ताटकळत बसलेल्या प्रवाशांनी सांगितले. जवळपासच्या गावातील लोकांनी देखील मदतकार्य केले. यंत्रणा उभी करून मुरूम टाकून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला.
15 तास वाहतूक ठप्प
डबक्यांत मोठ्या प्रमाणात माती साचल्यान वाहतूक करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या जड वाहतूक करणाऱ्यांना १२ ते १५ तास रस्त्यावरच ताटकळत बसावे लागले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.