आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक वळवणार:दर्गा चौक, संग्रामनगर पूल ते गोदावरी टी पॉइंटची वाहतूक तीस दिवस बंद राहणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड बायपासच्या कामामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे आता ६ फेब्रुवारीपासून तीस दिवस शहानूरमियाँ दर्गा चौक, संग्रामनगर उड्डाणपूल ते गोदावरी टी पॉइंटदरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी काढले आहेत.

रस्त्यांची कामे सुरू असल्याने जागतिक बँकेच्या प्रकल्प विभागाने पोलिस आयुक्तांना संग्रामनगर उड्डाणपुलावरील वाहतूक वळवण्याची विनंती केली होती. त्यानंतर रविवारी पर्यायी मार्गांची यादी जाहीर करण्यात आली. शहानूरमियाँ दर्गा चौक, संग्रामनगर उड्डाणपूल ते बीड बायपास, गोदावरी टी या मार्गावर ६ फेब्रुवारीपासून पुढे ३० दिवसांसाठी सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल.या काळात पर्यायी रस्ता वापरावा.

सतारा-देवळाईत ये-जा करण्यास पर्यायी मार्ग असे { वाहने देवळाई चौक- सूतगिरणी चौकमार्गे शहानूरमियाँ दर्गा चौकाकडे जातील व येतील. { संग्रामनगर उड्डाणपुलाशेजारील भुयारी मार्गाने पुढे एमआयटीच्या दिशेने जातील व येतील. { बीड बायपासवरील महूनगर टी पॉइंट-उस्मानपुरामार्गे दर्गा चौकाकडे जातील व येतील. { महानुभाव आश्रम चौक-रेल्वेस्टेशन चौक-हॉटेल विट्समार्गे उस्मानपुराकडे जातील व येतील.

बातम्या आणखी आहेत...