आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली दररोज वाहतूक कोंडी होते. उड्डाणपुलाखाली एमजीएमकडे जाणाऱ्या रस्त्याची रुंदी वाढवल्यास दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकतो तसेच सेंट फ्रान्सिस शाळेसमोरील लोखंडी फुलापासून सेव्हन हिल्सपर्यंतच्या मनपाने अधिग्रहित केलेल्या जागेवर रस्ता रुंदीकरण व फुटपाथ केल्याने वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळू शकते. असे असतानाही मनपा प्रशासन मात्र त्याबाबत गंभीर नसल्याने दररोज बाबा पेट्रोल पंपकडून सेव्हन हिल्स ते सेंट्रल नाक्यापर्यंत जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. विशेष म्हणजे सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली १८० सेकंदांचे सिग्नल लावण्यात आले असूनही ही समस्या उद्भवते. त्यामुळे सिग्नलचा वेळ कमी करावा, किया मोटारशेजारील वळण योग्य करून वाहतूक सुरळीत करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
सेव्हन हिल्स उड्डाणपुलाशेजारील कोहली मोटर्स या इमारतीशेजारी मुख्य जलवाहिनीसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाची रुंदी कमी आहे. कोहली मोटर्सने मनपाला जागा हस्तांतरित केली आहे. परंतु मागील पाच ते सात वर्षांपासून मनपा तेथे पूल तयार करून रस्ता रुंद करण्यास तयार नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे एकीकडे वाहतूक कोंडी तर दुसरीकडे रस्त्यावर होणारी पार्किंग यामुळे रहिवासी नाराज आहेत.
कुणीही लक्ष देत नाही मागील सात वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. अधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या. अधिकाऱ्यांनी अनेक वेळा स्थळ पाहणी केली. जी -२० अंतर्गत कामे सुरू आहेत. या कामाकडे मात्र कुणी लक्ष देत नाही. -प्रशांत देसरडा, माजी उपमहापौर
लवकरच कामाला सुरुवात करू निविदा झालेली आहे. स्थळपाहणी करण्यात आलेली आहे. काम देण्यात आले आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल व नागरिकांना सुविधा मिळेल. वाहतूक काेंडीचा प्रश्न मार्गी लागेल. - ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता मनपा
पूल बांधून रस्ता करा मनपा प्रशासनाने सेंट फ्रान्सिस लोखंडी पुलापासून सेव्हन हिल्स पुलाखालील किया मोटर्सजवळील कॉर्नरची जागा अधिग्रहित केली आहे. त्या जागेवर पूल बांधून रस्ता केल्यास वाहतूक कोंडी सुटेल. नागरिकांची अडचण होणार नाही. - डॉ. शरद सोमाणी
पुलाची रुंदी वाढवावी उड्डाणपुला-शेजारील कोहली मोटर्सलगत असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या पुलाची रुंदी वाढवल्यास किमान आठ फूट जागा मिळेल व वाहतूक कोंडी थांबेल. - विक्रम मुंदडा, व्यापारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.