आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन सज्ज:सिनेटसाठी 465 जणांना प्रशिक्षण; 26 नाेव्हेंबर राेजी मतदान होणार

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात १० जागांसाठी २६ नाेव्हंेबर राेजी मतदान होणार आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज झाले असून ४६५ अध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोमवारी विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. भगवान साखळे, उपकुलसचिव डॉ. विष्णू कऱ्हाळे, डॉ. मुस्तजीब खान, कक्षाधिकारी अर्जुन खांड्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी डॉ. साखळे, डॉ.मुस्तजीब खान यांनी निवडणुक प्रक्रियेबद्दल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. डॉ. विष्णू कऱ्हाळे यांनी सूत्रसंचालन केले. संजय लांब यांनी आभार मानले.यंदाची अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, गतिमान पद्धतीने राबवण्यात येत आहे. यात सहभागी झालेल्या सर्वांनी ही प्रक्रिया शिस्तबद्ध रीतीने राबवावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. येवले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...