आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:वाहतूक शाखेने 185 वाहने जप्त केली, 334 वाहनांवर दंडात्मक कारवाई 1 लाख 16 हजाराचा दंड वसूल

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरात वाहतूक शाखेच्या वतीने दुचाकी वाहनांवर कारवाईची मोहिम सुरुच असून बुधवारी ता. २० दुपारी चार वाजेपर्यंत १८५ वाहने जप्त करण्यात आली असून ३३४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.

हिंगोली शहरात दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक योगेशकुमार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी काढले आहेत. मात्र त्यानंतरही शहरातून दुचाकी वाहने घेऊन नागरीक फिरत असल्याचे चित्र होते. या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिस उपाधिक्षक रामेश्‍वर वैजणे यांच्यासह वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जमादार फुलाजी सावळे, शेषराव राठोड, गजानन सांगळे, गजानन राठोड, किरण चव्हाण, वसंत चव्हाण यांच्या पथकाने आज शहरात वाहन तपासणी मोहिम सुरु केली.

यामध्ये १८५ वाहन चालक विनाकारण शहरातून फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांची वाहने जप्त केली आहेत. या शिवाय ३३४ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. जप्त केलेली वाहने लॉकडाऊन संपल्यानंतरच सोडली जाणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांनी सांगितले.

अत्यावश्‍यक काम असेल तरच घराबाहेर पडावे ः ओमकांत चिंचोलकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक

वाहतूक शाखाहिंगोली शहरातील नागरीकांनी अत्यावश्‍यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे. त्यातही दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करू नये. यापुढे एकाच वाहनावर दोन वेळेस दंडात्मक कारवाई केल्याचे दिसून आल्यास त्यांची वाहने जप्त केली जातील. तसेच वाहन परवाना निलंबनाचा प्रस्ताव उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...