आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकन्नडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरिकांना चक्क उपवासाच्या भगरीतून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी (27 सप्टेंबर) उघडकीस आली. दरम्यान नागरिकांनी भगर खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या व चक्कर येऊ लागल्या. तसेच रुग्णांना उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. अशी माहिती रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. शरदसिंग परदेशी यांनी दिली
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये कविता बळीराम राठोड (वय 45), निकिता बळीराम राठोड (वय 18), अनिता तानाजी अहिरे (वय 45), रशालुबाई बाबुराव घुले (वय 35), पूर्णा अशोक जाधव (वय 35), छल्लीबई नारायण जाधव (वय 45), मालताबाई जगन्नाथ बोर्डे (वय 35), सुनिता साईनाथ बोर्डे (वय 35), कांताबाई भागिनाथ जेठे (वय 35) , निर्मला संजय काळे (वय 36), सोनाली ज्ञानेश्वर थोरात (वय 40) वर्ष असे रुग्णांची नावे आहेत. त्यापैकी कविता राठोड, निकिता राठोड, बाळासाहेब अहिरे, शालुबाई घुले, पूर्णा जाधव, चली बाई जाधव, भागुबाई बोर्डे या आठ जणांवर कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सुनिता साईनाथ कोरडे, कांताबाई भागिनाथ जेठे, निर्मला संजय काळे, यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. शरदसिंग परदेशी, डॉ प्रवीण पवार, डॉ.रुपेश माटे, परिचारिका स्वाती डोळस हे उपचार करत आहेत.
ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका शोभेची वस्तू
रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाची प्रकृती अचानक खालावली असेल, किंवा एखादा अपघातातील रुग्ण असेल अशा रुग्णांना औरंगाबाद येथे उपचारासाठी नेण्यासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दोन रुग्णवाहिका आहेत. परंतु मंगळवारी कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची तब्येत अचानक खालवल्याने त्यांना औरंगाबाद येथे रेफर करण्याचे वैद्यकीय अधिका-यांनी दिले. एक रुग्णवाहीकेत काही रुग्ण गेले मात्र उर्वरित काही रुग्णांना रुग्णालयात रुग्णवाहिका उभी असताना देखील खाजगी वाहनाने औरंगाबाद येथे उपचारासाठी जावे लागले. ह्या रुग्णवाहीका फक्त रुग्णालयाच्या शोभेसाठी आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अजून रुग्ण वाढण्याची शक्यता
मंगळवारी सकाळपासुन शहरातील अनेक खाजगी रुग्णालयात तालुकाभरातुन मोठ्या संख्येने भगरीच्या विषबाधेचे रुग्ण उपचार घेता आहेत. काही उपचार घेऊन घरी गेले आहेत. त्यामुळे तो 150 रुग्णांच्या वरती जाण्याची शक्यता आहे. भगरीतुन विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती अगदी वा-यासारखी तालुक्यात पसरल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आता उपवासाचे दिवस चालू आहेत. उपवासाचे पदार्थ चांगले दर्जाचे घ्यावेत. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना उत्तम प्रतीचे सुरक्षित व आरोग्यदायी अन्न पदार्थ उपलब्ध करुन देणे हे अन्न व औषध प्रशासनाचे अत्यंत महत्वाचे काम आहे. त्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने ज्या गावात रुग्ण आहे. 14 रुग्ण हे सगळे भगर खाल्ल्याचे आहेत. त्यामुळे ती भगर एकाच कंपनीची असेल. ती कन्नड मधूनच सप्लाय झाली असेल. त्या कंपनीवर लगेच बंदी आणावी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.