आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महोत्सव:शौर्य दिनानिमित्त भीमनगरात मानवंदना, रोगनिदान शिबिर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भीमा कोरेगाव शौर्य महोत्सवानिमित्त भीमनगर भावसिंगपुरा येथे शौर्य वीरांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. भदंत ज्ञानरक्षित व हर्षबोधी महाथेरो यांच्या हस्ते आदर्श सम्राट या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी प्रकाश गायक नाक्षण सावदेकर व राजाभाऊ शिरसाट यांच्या भीमा तुझ्या जन्मामुळे या संचाने कार्यक्रमात रंगत आणली. रोगनिदान व उपचार शिबिर घेण्यात आले. रुग्णांना पुढील शस्त्रक्रियांसाठी रेफर करण्यात आले. एमजीएम रुग्णालयाचे डॉ. हर्ष चौधरी, डॉ. वैष्णवी वानखेडे, डॉ. जयनाभ वैद्य, डॉ. कांचन पांडे, डॉ. वैभव, डॉ. शंतनू, महापालिकेचे डॉ सुहासिनी पाटील, मीनल ठोकळ, इम्रान शेख, योगिता ठोके, कमल मोरे, मनीषा थोरात यांनी यावेळी रुग्णांची तपासणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माजी नगरसेवक व वंचित बहुजन आघाडीचे नेते कृष्णा बनकर, अॅड. महावीरराजे भालेराव, बुद्धजी साळवे, अशोक थोरात, राजाभाऊ वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...