आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खादिमाने उर्दू फोरमतर्फे‎ यादे रफतगाँ कार्यक्रम‎:लता मंगेशकर यांना प्रथम स्मृतिदिनी गीतांमधून श्रद्धांजली‎

सोलापुर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिराचंद नेमचंद वाचनालय-‎ संगीत विभाग आणि खादिमाने उर्दू फोरम‎ यांच्यातर्फे अशर-ए-उर्दू २०२३ निमित्त‎ ‘यादे रफतगाँ'' या श्रध्दांजलीपर‎ कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते.‎ लता मंगेशकर आणि उर्दूचे अभ्यासक‎ साहित्यिक गोपीचंद नारंग यांना‎ श्रद्धांजली आणि स्मृती जागविण्यासाठी‎ कार्यक्रम घेतला. कार्यक्रमात मिर्झा‎ गालिब, इक्बाल, मीर तकी मीर, नक्ष‎ लायालपुरी, साहिर लुधियानवी, मजरूह,‎ गुलजार यांच्या फिल्मी आणि गैर-फिल्मी‎ गझल ऐकवण्यात आल्या.‎

नक्षत्र कराओके सिंगिंगचा‎ ‘तुम मुझे भुला ना पाओगे''‎ नक्षत्र कराओके सिंगिंग अकॅडमी च्या‎ वतीने डॉ. फडकुले सभागृह येथे‎ स्वरालता सुमनांजली या कार्यक्रमांतर्गत‎ ‘तुम मुझे भुला ना पाओगे'' हा गाण्यांचा‎ कार्यक्रम रंगला.‎ यावेळी तुम मुझे भुला ना पाओगे, सत्यम‎ शिवम सुंदरम, तुम ही मेरी मंझिल, कहीं‎ दिप जले कहीं दिल, जाने क्युँ लोग‎ मोहब्बत करते हैं, मैं तो कबसे खडी इस,‎ पुकारता चला हूँ मैं आदी एकापेक्षा एक‎ सदाबहार गीतांनी मैफल बहरत गेली. या‎ लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीत‎ सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.

बातम्या आणखी आहेत...