आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:नागरी कृती समितीतर्फे सुनीलला श्रद्धांजली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकाशवाणी रस्त्यावर रविवारी वाहनाने दिलेल्या धडकेत सुनील काळे (३१) या चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला होता. सोमवारी आकाशवाणी चौकात झालेल्या सभेत त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेला सुनीलची आई, मावशी, भाऊ उपस्थित होते.

जवाहर कॉलनी नागरिक कृती समिती गेल्या सहा महिन्यांपासून आकाशवाणी चौक खुला करण्यात यावा, या मागणीसाठी लढा देत आहे. या चौकात एका वर्षात झालेला हा तिसरा अपघात आहे. या अपघातास पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत, असे म्हणत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी समितीचे अध्यक्ष नंदकुमार गवळी यांनी केली. या वेळी जवाहर कॉलनीतील नागरिक, व्यापारी उपस्थित होते.

आमच्या कुटुंबाचा आधार गेला आमच्या कुटुंबाचा आधार असलेला सुनील गेला असे म्हणत त्याची आई अनुराधा यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्या म्हणाल्या, एक वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. घराची सर्व जबाबदारी सुनीलवरच होती. संजयनगर भागात आम्ही भाड्याने राहतो. सुनील चहाच्या टपरीवर कामाला होता. त्याला जे मिळायचे त्यावरच आमचे घर चालत होते.

बातम्या आणखी आहेत...