आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहमिलन:संकटावर मात करून पुन्हा भरारी घेणाऱ्या दोन व्यापाऱ्यांचा सत्कार

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावाच्या मृत्यूनंतर ऑटोमोबाइल व्यवसायाची धुरा सांभाळणाऱ्या देशमुख तर २ महिने कोमात राहून बाहेर पडलेल्या राहुल मुथांचा औरंगाबाद डिस्ट्रिक्ट ऑटोमोबाइल टायर डीलर्स असोसिएशनच्या स्नेहमिलन सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात आला. २८ वर्षांपूर्वी १९८४ मध्ये स्थापन झालेल्या या असोसिएशनमध्ये ३५० सदस्य आहेत. मातोश्री लॉन्समध्ये नुकताच स्नेहमिलन सोहळा झाला.

असोसिएशन सदस्यांच्या समस्या सोडवण्यासोबतच असोसिएशन सामाजिक कार्यक्रमांचे जाणीवपूर्वक आयोजन करते. घाटी रुग्णालयात वैद्यकीय साहित्याची भेट, रक्तदान शिबिराचे आयोजन असोसिएशन करते. ऑटोमाेबाइल अँड टायर असोसिएशन सदस्यांची व्यवसाय वृद्धी होण्यासाठी कौशल्याधारित कार्यशाळा, व्याख्यानांचे आयोजन करते. स्नेहमिलन सोहळ्यात असोसिएशनच्या ज्येष्ठांनाही सन्मानित करण्यात आले.

या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कावले यांनी ऑटोमोबाइल क्षेत्रात होणाऱ्या व्यावसायिक बदलाविषयी मत व्यक्त केले. उपाध्यक्ष प्रवीण आंचलिया, सचिव चेतन सुराणा आणि कोषाध्यक्ष आनंद चवरे उपस्थित हाेते. शैलेश देशपांडे आणि लक्ष्मीकांत नांदेडकर यांनी सूत्रसंचालन केले.

भावाच्या मृत्यूनंतर सांभाळला व्यवसाय
भाऊ अतुल देशमुख यांचा हृदयविकाराच्या झटक्याने २०१३ मध्ये मृत्यू झाला. यानंतर वहिनी आणि मी व्यवसायाची धुरा सांभाळली. कालांतराने मी व्यवसाय करिअर म्हणून चालवला आहे. अर्चना गोसावी-देशमुख, सदस्य

कुटुंब आणि असोसिएशनच्या पाठिंब्याने पुनर्जन्म
७ जुलै २०२१ ला फुलंब्रीजवळ अपघात झाला. मेंदूला दुखापत झाली होती. एक महिना व्हेंटिलेटरवर होतो. तीन महिने उपचार सुरू होते. या प्रसंगातून बाहेर पडताना कुटुंबाचा आधार आणि असाेसिएशनचा पाठिंबा मला उभे करणारा ठरला. राहुल मुथा, सदस्य

असोसिएशनतर्फे उभारी देण्याचा प्रयत्न
असोसिएशनच्या स्नेहमिलनात विशेष उपलब्धी, शक्तिशाली महिला आणि बाउन्स बॅक असे तीन पुरस्कार देऊन सदस्यांना सन्मानित करण्यात आले. चेतन सुराणा, सचिव

बातम्या आणखी आहेत...