आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोटच्या मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्यानंतर पीडितेवर दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणात डीएनए चाचणीआधारे न्यायालयाने नराधम पित्याला विविध कलमांखाली तीन जन्मठेप, एक लाख ९५ हजारांच्या दंडाची शिक्षा, तर गुन्हा लपवणाऱ्या मातेला सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी सोमवारी (३ एप्रिल) रोजी ठोठावली. मासिक पाळी न आल्याने वैद्यकीय उपचारादरम्यान अल्पवयीन पीडिता गर्भवती असल्याचे पुढे आले होते. १३ ऑक्टोबर २०१९ रोजी नराधमाने दिलेल्या खोट्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आपण फसणार याची कुणकुण लागल्यावर त्याने पीडितेच्या आईसह रुग्णालयातून पळ काढला होता. डीएनए तपासणीत नराधम पित्याचे हे दुष्कृत्य उघड झाले. प्रकरणात तपास अधिकारी पोलिस निरीक्षक राजश्री आडे आणि उपनिरीक्षक आरिफ शेख यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीत सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी भक्कमपणे बाजू मांडली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.