आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट स्पर्धा:व्हिजनची विजयी सलामी; गुरुकुल संघाचा पराभव

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिजन संघाने सोमवारी २५ वर्षांखालील गुलाबी चेंडूवरील क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. संघाने सलामीच्या सामन्यात रुपीट मैदानावर गुरुकुल टीमचा पराभव केला. व्हिजन संघाने १४ धावांनी सामना जिंकला. या लढतीत प्रथम फलंदाजी करताना व्हिजन संघाने निर्धारित षटकांत १३२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात गुरुकुल अ संघ निर्धारित षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात फक्त ११८ धावांपर्यंत मजल मारू शकला. व्हिजन संघाचा गोलंदाज गणेश मतेने २ षटकांत अवघ्या ४ धावा दिल्या. धीरज थोरातने ४ षटकांत १९ धावा देत १ गडी बाद केला. त्याने एक षटक निर्धाव टाकले. गुरुकुलकडून अमोल मोठेने सर्वाधिक ३९, निहारने २६, सोहम राठोडने ११ धावा केल्या.

बातम्या आणखी आहेत...