आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:सेनगाव जवळून सिमेंट पोत्यांसह पळविलेल्या ट्रक पुसद तालुक्यातील रोडा गावाजवळून जप्त, ४९६ पोत्यांचा शोध सुरू

हिंगोली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव जवळ सिमेंट रस्त्यांच्या कामावर आणण्यात आलेले सिमेंट पोते न उतरवता सिमेंट पोत्यांसह पळवलेला ट्रक सेनगाव पोलिसांनी शुक्रवारी (ता. ३) दुपारी पुसद तालुक्यातील रोडा गावाजवळून जप्त केला आहे. पोलिसांनी आता ट्रक मधील ४९६ पोत्यांचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून सिमेंट रस्ता केला जात आहे. या रस्त्यासाठी संबंधित कंपनीने कर्नाटक राज्यातील यादवाड येथून दालमिया कंपनीचे १ लाख ४३हजार रुपये किमतीचे ५२० सिमेंटचे पोते मागवले होते. सदरील पोते  नांदेड जिल्ह्यातील एका ट्रक मधून ( एम. एच. २६- एडी -८३०२) सेनगाव येथे आणले जात होते. सदरील ट्रक (ता.२९) जून रोजी ट्रक सेनगाव येथे पोहोचल्यानंतर ट्रकचालक विनोद चव्हाण (रा. ब्राह्मणगाव ता. पुसद) याने ट्रक मालक मारोती पवार यांच्या भावास सेनगाव शहरातुन जेवणाचा डबा तसेच एटीएम मधून पैसे काढण्यासाठी पाठवले. ही संधी साधत चालक विनोद चव्हाण याने ट्रक मधील सिमेंट सह ट्रक घेऊन पोबारा केला. काही वेळानंतर मारोती पवार यांचा भाऊ परत आल्यानंतर त्यांना ट्रक दिसलाच नाही. त्यामुळे त्यांनी हा प्रकार मारोती पवार यांना सांगितला.

 त्यानंतर ट्रकची शोधाशोध सुरू झाली सदर ट्रक पुसद तालुक्यातील रोडा गावाजवळ असल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणात पवार यांनी शुक्रवारी ता. ३ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये ट्रकचालक विनोद चव्हाण याने सिमेंटच्या पोत्या सह ट्रक पळविल्याची नमूद केले. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 दरम्यान सदर ट्रक रोडा गावाजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज सेनगावचे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, जमादार दिलीप नाईक, महादेव शिंदे, भिकाजी मेनकुदळे यांच्या पथकाने आज रोडा गावाजवळ जाऊन ट्रक जप्त केला. या ट्रकमध्ये सिमेंटचे  २४ पोती शिल्लक असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर पोती ही जप्त केले आहेत. त्यानंतर आता पोलिसांनी ट्रकचालक विनोद चव्हाण याचा शोध सुरू केला असून त्यांनी सिमेंटची पोती कोणाला विक्री केली याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सेनगांव पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser