आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पळवापळवी:लाइनमनशी संगनमत करून पाणी पळवापळवीचे प्रकार रोखण्याचा प्रयत्न

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाइनमनला हाताशी धरून पाण्याची पळवापळवी करण्याचे प्रकार अनेक वसाहतीत होतात. त्याला रोखण्याचा प्रयत्न होणार आहे. शहरातील सुमारे २२०० व्हॉल्व्ह किती वाजता उघडले आणि बंद केले याची माहिती जिओ फेन्सिंगने स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल रूमला कळणार आहे, असे प्रभारी मनपा प्रशासक, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. अनेक राजकीय मंडळी लाइनमनशी संगनमत करून व्हॉल्व्हचे वेळापत्रक मनासारखे करून घेतात. हा प्रकार बंद करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. ३५०० पैकी २२०० व्हॉल्व्हचे लोकेशन मॅपिंग झाले. २९० लाइनमनना अँड्रॉइड मोबाइल देऊन जिओ फेन्सिंग करण्यात येईल. व्हॉल्व्ह सुरू-बंद करताना त्यांना पंचिंग करावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...