आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिस्क्रिप्शन, नोंदी व्यवस्थित का नाही:तुकाराम मुंडेंनी अधिकाऱ्यांना विचारला जाब, म्हणाले- नेत्र रुग्णालयाच्या जागेचा सचिवांना अहवाल देणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमखास मैदानावरील नेत्र रुग्णालयाची जागा कॅन्सर हॉस्पिटलच्या विस्तारीकरणासाठी हवी आहे. या जागेची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक सेवा संचालनालयचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नेत्र रुग्णालय तसेच कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी केली. याबाबतचा अहवाल मी मुख्य सचिवाला देणार असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्यासह त्यांनी आमखास परिसरातील जिल्हा नेत्ररूग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, नेत्रचिकित्सक डॉ. संतोष काळे अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ महेश वैष्णव यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

तुकाराम मुंडेंची नाराजी

आमखास मैदान येथील जिल्हा नेत्र रुग्णालयाची पत्र्याच्या शेडमधील बाह्यरुग्ण विभाग सुरु होता. मात्र नेत्र रुग्णालयाचे चार हॉल रिकामे पाहून तुकाराम मुंडेंनी नाराजी व्यक्त करीत नेत्र ओपीडी मुख्य इमारतीमध्ये भरवण्याच्या सुचना केल्या. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला तीन दिवस भरती ठेवणे, प्रिस्क्रिप्शन आणि नोंदी व्यवस्थित का नाही असा जाब विचारत अधिकाऱ्यांची त्यांनी खरडपट्टी काढली.

बीडमध्ये तेच सांगावे लागले इथेही तेच सांगावे लागतेय म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी मुंडे यांनी रुग्णांशी संवाद साधत जेवण काय मिळाले चहा मिळाला का ऑपरेशन कधी आहे याची विचारणा केली.

कँन्सर हॉस्पीटलची पाहणी

आमखास परिसरात असलेल्या नेत्र रुग्णालयाची पाहणी करत कर्करोग रुग्णालयाच्या कामाचीही त्यांनी माहिती घेतली. राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीकरणासाठी नेत्र रुग्णालयाची जागा आवश्यक असल्याबद्दल अधिष्ठाता डॉ वर्षा रोटे यांनी माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभागीय केंद्रांच्या जागेची त्यांनी पाहणी त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...