आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनामुळे यंदा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले. परंतु बोर्ड परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप नेमके कसे असणार आहे. यावर निर्णय स्पष्ट झालेला नाही. हे नसे थोडके आता बारावी बोर्ड परीक्षा आणि जेईई मेन्सची परीक्षा एकाच वेळी येत असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर शिक्षकांचे म्हणणे आहे की, परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी-मार्च मध्ये होत असल्याने अडचणी नव्हती. परंतु यंदा एप्रिल-मे मध्ये दोन्ही परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांची जेईई मेन्सची एक संधी हुकण्याची शक्यता आहे.
देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शैक्षणिक सत्र उशीरा सुरु करण्यात आले. तर दरवर्षी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येत असे. त्याच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला. २५ टक्के अभ्यासक्रमही कमी करण्यात आला आहे.
परंतु हा अभ्यासक्रम पाठ्यक्रमाने नाही तर पाठ्यक्रमातील काही उतारे कमी करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णच अभ्यासक्रमावर आधारित अभ्यास करावा लागतो आहे. तर बारावी नंतर प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करिअरची दिशा ठरविण्यासाठी विद्यार्थी सीईटी, नीट, जेईईची देखील तयार करत असतात. यंदा कोरोनामुळे जेईई मेन्स परीक्षा प्रथमच चार वेळा घेण्यात येत आहे. त्याचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले असून, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत.
फेब्रुवारी आणि मार्च मध्ये होणाऱ्या टप्पयात जे विद्यार्थी जेईई मेन्स देतील त्यांना अडचण येणार नाही. उलट त्यांना त्यांच्या चुका कळू शकतील. परंतु ज्या विद्यार्थ्यांचे बारावीचा जेईईचा पेपर हा एप्रिल - मे मध्ये असेल त्यांची मात्र एक संधी जाईल. जेईई मेन्सची पहिल्या टप्प्यातील परीक्षा ही २३ ते २६ फेब्रुवारी आहे. तर दुसरा टप्पा १४ जे १८ मार्च आणि तिसरा २७ ते ३० एप्रिल असणार आहे. या दोन्ही परीक्षा एकाचवेळी आल्याने विद्यार्थ्यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. असे शिक्षकांनी सांगितले.
जेईई आणि बोर्डाच्या परीक्षा एकाच वेळी आल्याने विद्यार्थ्यांची अडचणी होईल. जेईई यंदा चार वेळा होणार असली तरी परीक्षांचे वेळापत्रक आणि नंतर येणाऱ्या पुरवणी परीक्षांचा विचार करता. विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांच्या सादरीकरणावर याचा परिणाम होवू शकतो. त्यामुळे यातून मार्ग काढयला हवा. जेने करुन विद्यार्थी जेईई मेन्स आणि बोर्ड परीक्षा दोन्ही देवू शकतील. - आर.बी. गरुड उपप्राचार्य देवगिरी महाविद्यालय
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.