आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हट्टा येथील तरुणाच्या खूनाला बारा तासात वाचा फुटली, दोघांना अटक, दारूच्या कारणावरून झाला खून

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील हट्टा येथील एका तरुणाच्या खुनाचा पोलिसांनी अवघ्या बारा तासात छडा लावला. दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून खून झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी सोमवारी (ता. २०) रात्री दोघांना अटक केली आहे.

वसमत तालुक्यातील हट्टा येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील मैदानावर प्रभाकर उर्फ प्रभू गंगाराम ठोके (३५)  यांचा मृतदेह सोमवारी (ता. १९) सकाळी आढळून आला होता. त्यांच्या गळ्यावर आवळ्याच्या खुणा असल्यामुळे हा नेमका खून की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांसमोर उभारला होता. वसमतचे पोलिस उपाधीक्षक सतीश देशमुख, हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे,  उपनिरीक्षक एस.बी. थडवे, जमादार इमरान कादरी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

 सदर तरुणाचा खून असल्याचे गृहीत धरून पोलिसांनी तपास चालवला. पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले. मात्र श्रान पथक घटनास्थळी घुटमळले. यावेळी चौकशीमध्ये ठोके यांच्यासोबत अन्य दोघेजण होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी शास्त्रोक्त पद्धतीने तपास केला. त्यामध्ये हट्टा येथील लोभाजी ऊर्फ पिंटू सांगळे व शेख वाजिद शेख . चुन्नूअशिक्षित हे दोघेजण प्रभाकर ठोके यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले.  या प्रकरणात सोमवारी (ता. २०) रात्री उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

या घटनेनंतर पळून जाणाऱ्या लोभाजी सांगळे यास पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील मानवत येथून ताब्यात घेतले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता दारू पिण्याच्या कारणावरून प्रभाकर ठोके यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी शेख वाजेद यालाही अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...