आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:एनडीएतून भरल्या जाणाऱ्या फायटर पायलटच्या अठ्ठावीस जागा घटल्या, परीक्षा गेल्या पाच परीक्षांच्या तुलनेत 2019 चा कट-ऑफ 21 गुणांनी वाढला

औरंगाबाद (सतीश वैराळकर)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनडीएची परीक्षा देताना नौदलात जाऊ इच्छिणाऱ्यांनी एनडीएऐवजी नेव्हल अकादमीला प्राधान्य दिले तर फायदा होतो.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये भरल्या जाणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या फायटर पायलटच्या २८ जागा कमी झाल्या आहेत. यासंबंधी नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार वायुसेनेच्या वाट्याला येणाऱ्या १२० फायटर पायलट या अधिकारी पदांच्या जागांमध्ये २८ जागा ग्राउंड ड्यूटी अधिकाऱ्यांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एनडीएमध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारीपदाच्या प्रशिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीचा कट-ऑफ मागील पाच परीक्षांच्या तुलनेत २१ गुणांनी वाढल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे ३० डिसेंबर २०२० रोजी संरक्षण दलात भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या छात्रांसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे व नेव्हल अकादमी प्रवेशपूर्व परीक्षेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संबंधित प्रवेशपूर्व परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२१ आहे. परीक्षेच्या माध्यमातून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये ३७० जागा उपलब्ध आहे. भारतीय सैन्य २०८, नौदल ४२, वायुदल १२०, तर नेव्हल अकादमीसाठी ३० जागा असणार आहेत. वायुदलात १२० जागा यापूर्वी फायटर पायलटसाठी भरल्या जात होत्या. यावर्षी २८ जागा या वायुदलातील ग्राउंड ड्यूटी ऑफिसरसाठी राखून ठेवल्याने फायटर पायलटच्या केवळ ९२ जागाच भरण्यात येणार आहेत. ग्राउंड ड्यूटीमध्ये मिसाइल कंट्रोलर, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, फायटर एअर कंट्रोलर, रडार कंट्रोलर इंजिनिअरिंग ब्रॅच आदींचा समावेश राहील. या परीक्षेमधून निवड झालेल्या छात्रांना जानेवारी २०२२ मध्ये एनडीएमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल.

गुणांचा कट-ऑफ वाढला
मागील पाच वर्षांच्या तुलनेत २०१८ चा अपवाद वगळता स्पर्धा परीक्षेचा कट-ऑफ २१ गुणांनी वाढला आहे. वर्षात दोन वेळा परीक्षा घेतली जाते. एनडीएच्या २०१६ मधील प्रथम लेखी परीक्षा व मुलाखतीमधून अतिमत: निवडल्या गेलेल्या गुणवत्ता यादीमधील शेवटच्या छात्राचे गुण १८०० पैकी ६५६ इतके होते, तर दुसऱ्या परीक्षेत ६०२ इतके होते. २०१७ मध्ये पहिल्या परीक्षेत ७०८, तर दुसऱ्यामध्ये ६२३ इतके होते. २०१८ मध्ये पहिल्या परीक्षेत ७०५, तर दुसरीत ६८८ होते. २०१९ मध्ये पहिल्या परीक्षेत ७०४, तर दुसऱ्या परीक्षेत ७०९ इतके होते. मागील पाच परीक्षांचा सरासरी विचार केल्यास २०१९ मध्ये कट-ऑफ २१ गुणांनी वाढल्यामुळे परीक्षेतील स्पर्धा वाढली आहे.

नेव्हल अकादमीला प्राधान्य द्यावे
एनडीएची परीक्षा देताना नौदलात जाऊ इच्छिणाऱ्यांनी एनडीएऐवजी नेव्हल अकादमीला प्राधान्य दिले तर फायदा होतो. एनडीए प्रशिक्षणानंतर उशिराने नेव्हल अकादमीचे प्रशिक्षण सुरू होते. एनडीएच्या निकालानंतर ७ दिवसांनी अकादमीचा निकाल लागतो. एनडीएचा कट-ऑफ अकादमीपेक्षा कमी असतो. एसएसबी उत्तीर्ण झाला तरी प्रतीक्षा यादी महत्त्वाची असते. कर्नल अमित दळवी, संचालक, एसपीआय, औरंगाबाद.

बातम्या आणखी आहेत...