आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वेळी-अवेळी आणि भूक नसताना जेवल्याने अनेक आजारांना मनुष्याने निमंत्रण दिले आहे. त्यातील मधुमेह हा असा आजार आहे, जो इतर आजारांना घेऊन येतो. त्यामुळे मधुमेहाला माघारी पाठवायचे असेल तर दोन वेळा प्रचंड भूक लागेल तेव्हा यथेच्छ जेवा. मधल्या वेळात घरचे ताक प्या. कोणत्याही फ्लेव्हरशिवायचा ब्लॅक टी प्या, असा महत्त्वपूर्ण सल्ला प्रख्यात मधुमेहतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) दिला.
‘दिव्य मराठी’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन औरंगाबादेतील ‘दिव्य मराठी’ कार्यालयात डॉ. दीक्षित यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांना ‘जीवनशैली आणि मधुमेह’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे, सीओओ निशित जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. दीक्षित म्हणाले, माझे वजन वाढले तेव्हा ते कमी करण्यासाठी मी अनेक पद्धतींचा वापर करत होतो. त्याचदरम्यान डॉ. श्रीकांत जिचकार यांचा व्हिडिओ पाहण्यात आला. त्यांनी आहारशैलीविषयी जे सांगितले त्याचे प्रयोग मी करून पाहिले. त्यानंतर मी दिवसातून दोनदाच जेवा आणि मधुमेहाला माघारी पाठवा या निष्कर्षाला आलो. या पद्धतीने अनेकांनी मधुमेहावर मात केल्याची उदाहरणे माझ्याकडे आहेत, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास विदर्भ आवृत्तीचे संपादकीय प्रमुख सचिन कापसे, सॅटेलाइट आवृत्तीप्रमुख नितीन फलटणकर, स्टेट न्यूजरूम हेड गजानन औटी, एचआर स्टेट हेड अन्वर अली, डिझाइन स्टेट प्रमुख गजानन दौड, एसआयटी प्रमुख अजय कुलकर्णी, स्पोर्ट््स डेस्क हेड एकनाथ पाठक, समन्वयक शैलेश इंदाणी यांची उपस्थिती होती.
भगवान मुझे दो वक्त की रोटी दो :
डॉ. दीक्षित म्हणाले की, मधुमेहाचे निदान झाले की जीवनशैली अधिक शिस्तबद्ध होते. कोणतीही व्यक्ती देवाकडे अशीच प्रार्थना करते की, देवा मला दोन वेळचे जेवण दे. भगवान मुझे दो वक्त की रोटी दे. कारण, पूर्वी माणसाची आहार पद्धती दोन वेळा जेवणाची होती आणि ते निरोगी होते.
अशी ठेवा आहार पद्धती :
दिवसभरात ज्या दोन वेळा सर्वाधिक भूक लागते त्याच वेळी हवे ते, हवे तेवढे जेवा. दोन जेवणात फक्त घरचे ताक किंवा फ्लेव्हर नसलेला ब्लॅक टी प्या. दररोज साडेचार किलोमीटर चालावे.
‘मधुमेहाची माघार’ याविषयी आज मार्गदर्शन
डॉ. दीक्षित यांचे ‘रिव्हर्सिबल डायबिटीस’ या विषयावर १४ नोव्हेंबर रोजी म्हणजे जागतिक मधुमेह दिनानिमित्त दुपारी ३ वाजता ऑनलाइन व्याख्यान, प्रश्नोत्तरे कार्यक्रम होणार आहे. डॉ. दीक्षित यांच्या मार्गदर्शनाचा व्हिडिओ अत्यंत लोकप्रिय आहे. त्याचा जगभरातील लोकांना फायदा व्हावा म्हणून तामिळ, मल्याळम, गुजराती आदी ११ भारतीय आणि अरेबिक, जपानी, चिनी आदी ५ आंतरराष्ट्रीय भाषांत त्याचा अनुवाद करण्यात आला आहे. त्याचे १४ रोजी ऑनलाइन प्रकाशन होणार आहे. आहारशैलीत बदल करून मधुमेह माघारी पाठवणाऱ्या १३ जणांच्या यशोगाथांची माहितीही याच कार्यक्रमात दिली जाणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.