आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय:सचखंड मध्ये दाेन एसी डबे वाढणार, 130 प्रवाशांची सोय

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचखंड एक्स्प्रेसमध्ये १० एप्रिल २०२२ पासून एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित आणि एक तृतीय श्रेणी वातानुकूलित डबा कायमस्वरूपी वाढवण्यात येणार आहेत. यामुळे मराठवाड्यातील १३० अतिरिक्त प्रवाशांची सोय होणार आहे.

वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेसमध्ये एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित आणि एक तृतीय श्रेणी वातानुकूलित डबा वाढवला आहे. नांदेडहून सुटणाऱ्या रेल्वेत १० एप्रिल तर अमृतसरहून १२ एप्रिल २०२३ पासून हे डबे वाढवले जातील. या डब्यांमुळे दाेन्ही बाजूंनी प्रत्येकी १३० प्रवाशांची साेय हाेणार आहे. सचखंड एक्स्प्रेसचे आरक्षण मिळत नसल्यामुळे नांदेडहून दिल्लीसाठी औरंगाबादमार्गे नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे.

नांदेड व अमृतसर या दाेन धार्मिक स्थळांना जाेडणाऱ्या सचखंड रेल्वेने भारतीय व विदेशी प्रवासी माेठ्या संख्येने प्रवास करतात. या रेल्वेचे आरक्षण सहजासहजी मिळत नाही. यामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची माेठी गैरसाेय हाेते. आता दाेन डबे वाढल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...