आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:हेल्मेट हँडल ऐवजी डोक्यावर असते तर वाचले असते प्राण, एएस क्लब चौकात दोन दिवसांत दोन अपघाती बळी

वाळूज (संतोष उगले)8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज मार्गे एएस क्लब चौकातुन पुढे पैठण लिंक रोड मार्गे जाण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. ठार झालेल्या दुचाकीस्वार जयकुमार बाबुराव टेके (३६, रा.आलियाबाद, औरंगाबाद) यांनी आपले हेल्मेट गाडीच्या हँडलवर लटकावले होते; जर हेच हेल्मेट त्यांनी डोक्यावर घातले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते.

याऔरंगाबाद येथील रहिवासी जयकुमार हे त्यांच्या दुचाकीवरून एएस क्लब चौकातुन पुढे पैठण लिंक रोड मार्गे जाण्यासाठी निघाले असता भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने जयकुमार यांच्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने ते डोक्यावर पडले. डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव सुरू होऊन ते जागीच बेशुद्ध झाले. दरम्यान ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बेशुद्धावस्थेत असलेल्या जयकुमारला घाटीत रवाना केले. मात्र, त्यास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

अवघ्या 48 तासांत दुसरा मृत्यू
याच चौकात कंटेनरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार सुरक्षा रक्षक ठार झाल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी सकाळी घडली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत याच ठिकाणी पुन्हा एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याने या मार्गावर तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी वाहनधारक कामगार, उद्योजक व नागरिकांतून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...