आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहानूरमियाँ दर्गा चौकात मोक्यावर असलेली श्रीहरी पॅव्हेलियनची जागा अखेर मनपाने ताब्यात घेतली. या ठिकाणी आता पालिकेचे मुख्यालय उभारण्यात येणार आहे. श्रीहरी असोसिएट्सला २०१२ मध्ये मनपाने अडीच एकर जागा बीओटीवर दिली होती. दरवर्षी ३.३० लाख रुपये भाडे ठरले होते. पण लीज अॅग्रीमेंट झाले नव्हते. असोसिएट्सने सुरुवातीचे एक वर्षे भाडे भरले. मात्र नंतर लीजचे कारण देऊन भाडे थकवले. त्यामुळे विकासकाचा करार रद्द करण्याचा निर्णय मनपाने घेतला.
ही जागा विकसित करण्यासाठी श्रीहरी असोसिएट्सने खर्च केलेले आठ कोटी रुपये त्यांना परत देऊन जागा ताब्यात घेण्याचे ठरले. तशी नोटीसही बजावली. अखेर विकासक सचिन मुळेही तयार झाले. थकीत भाड्याचे ३ कोटी ५६ लाख रुपये वजा करून साडेचार कोटी रुपये देऊन ही जागा अखेर मनपाने ताब्यात मिळवली. सध्या या जागेवर खासगी ट्रॅव्हल्स उभ्या राहतात. तसेच दर सोमवारी आठवडे बाजारही भरतो. वाहनतळाच्या माध्यमातून दरवर्षी एक लाख रुपये तर आठवडी बाजारातून एक लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मनपा प्रशासनाला मिळू शकेल.
पंचवटी चाैक, जकात नाका जागेचा हाेता पर्याय
मनपाचे कार्यालय बदलण्याचा पहिला प्रस्ताव २००७ ला आला. तेव्हापासून जागेचा शोध सुरू होता. पंचवटी चौकालगतच्या जागेची चाचपणी झाली, पण कोर्टकचेरीत ही जागा अडकली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यवर्ती जकात नाक्याच्या जागेचा उल्लेख केला हाेता. पण आता शहानूरवाडीतील जागेचा मुद्दा पुढे आला. या अडीच एकर जागेची किमत मनपाच्या मते ३० कोटी रुपये आहे. ३० वर्षांसाठी ती कराराने दिली हाेती. मात्र योग्य करार झाला नाही, असा श्रीहरी असोसिएट््सचा दावा आहे.
६०० जागांचा वाद प्रलंबित
श्रीहरी असोसिएट्सने या जागेवर उभारलेले पत्र्याचे शेड जाधववाडी येथे होणाऱ्या स्मार्ट सिटी बसच्या डेपोसाठी वापरण्यात येणार आहे. मनपाच्या ६०० जागांचा वाद असल्याचे सूत्रांनी सांगितले. या मोकळ्या भूखंडांची किंमत ३०० कोटी पेक्षा अधिक आहे. मनपाने जागा परत घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.