आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Two And A Half Lakh Marriages, Eight Days Later The Family Was Given Anesthesia And The House Was Cleaned; Fake Wedding Racket Arrested News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:अडीच लाखांत लग्न, आठ दिवसांनंतर कुटुंबीयांना बेशुद्धीचे औषध देत घर साफ; बनावट लग्न लावून देणारे रॅकेट गजाआड

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवगाव पोलिसांची कारवाई; वर्षभरात एका मुलीचे पाच ते सहा जणांसोबत लग्न

लग्नाच्या शोधात असलेल्या उपवराला किंवा वय जास्त झालेल्या मुलाला शाेधून त्यांच्याकडून किमान अडीच ते पाच लाख रुपये घेत मुलीचे लग्न लावून द्यायचे. आठ दिवसांनंतर कुटुंबीयांना रात्री जेवणातून बेशुद्धीचे औषध देऊन पैसे, साेने घेऊन मुलगी फरार व्हायची. वर्षभरात एक मुलगी असे पाच ते सहा लग्न करत होती. अशा प्रकारे बनावट लग्न करून फसवणारी टोळी देवगाव रंगारी पोलिसांनी शुक्रवारी गजाआड केली. या टोळीतील लोकांनी औरंगाबाद, नाशिक, जळगावसह गुजरात येथे बनावट लग्न लावून फसवणूक केली. आशा विलास खडसे (रा. वाशिम), कल्पना सुधाकर पाटील (रा. कासगाव, मुंबई), सविता चंद्रकला कुलकर्णी (रा. नाशिक), नीलेश दिलीप पाटील (रा. नाशिक) असे या टोळीतील सदस्यांची नावे अाहेत.

आशाबाई ही या टोळीची म्होरक्या हाेती. औरंगाबाद परिसरात अशी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार देवगाव रंगारी पोलिसांनी बनावट नवरदेव तयार करून लग्नासाठी मुलगी हवी आहे, असा निरोप या टाेळीला पाठवला. त्यानुसार देवगाव फाटा येथील हॉटेल पद्मावतीजवळ लग्नाची बोलणी करण्यासाठी या टोळीचे सदस्य आणि मुलगी आली. पोलिस वराचे नातेवाईक म्हणून साध्या वेशात उपस्थित होते. दुपारी पावणेतीन वाजता हॉटेलसमोर तीन महिला व एक पुरुष एका वाहनातून अाले. खबऱ्याने पोलिसांना इशारा करताच टोळीतील सदस्यांच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी खाक्या दाखवताच सूत्रधार आशाने एकाच तरुणीचे अनेकांशी विवाह लावून दिल्याचे फोटो सापडले. या टोळीकडून ७ मोबाइल, महिलांचे ७ बनावट आधार कार्ड, एक इंडिका कार असा चार लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीकडे विविध बनावट आधार कार्ड सापडले. ते वेगवेगळ्या भाषेत आहेत. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी संदीप गावित, सहायक पोलिस निरीक्षक संजय अहिरे, उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, पोलिस अंमलदार अप्पासाहेब काटे, मनोज लिंगायत, लता भोसले, ठोंबरे, गवळी, जाधव आणि गिरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तक्रार गांभीर्याने घेतली म्हणून प्रकार उघडकीस या टोळीने शिल्लेगाव पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील माळीवडगाव येथील एका व्यक्तीकडून अडीच लाख रुपये घेऊन लग्न लावून दिले होते. अवघ्या पाच दिवसांनंतर वधूने लग्नात मिळालेले ४० हजारांचे साेन्याचे दागिने घेऊन पोबारा केला हाेता. ती बेपत्ता झाल्याची तक्रार देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीचा गांभीर्याने तपास केल्याने हा प्रकार उघडकीस आला.

वर्षभरात एका मुलीचे पाच ते सहा जणांसोबत लग्न
ही टोळी प्रामुख्याने एजंट मार्फत लग्नास इच्छुक मुलांची माहिती घेेत असे. नंतर त्यांच्याशी बोलणी करून मुलीचे आई-वडील, मावशी बनून लवकरात लवकर लग्न करण्यासाठी तगादा लावत असत. या टोळीत पाच ते सहा मुली असून एका मुलीचे वर्षभरात चार ते पाच लग्न लावून देत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...