आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:अडीच वर्षे मौन, आता सिडको फ्री होल्डसाठी उद्धवसेनेचे उपोषण, फ्री होल्ड सम करताना नाममात्र दर आकारणीची मागणी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे नगरविकासमंत्री असताना सिडकोत फ्री होल्ड (मालकी हक्क) केले म्हणून तत्कालीन आमदार, विद्यमान सहकारमंत्री अतुल सावे यांनी पेढे वाटले होते. प्रत्यक्षात कार्यवाही काहीच झाली नाही. आता शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी फ्री होल्ड करावे या मागणीसाठी उद्धवसेना उपोषण करणार आहे. अडीच वर्षे उद्धव ठाकरे असताना या प्रश्नासाठी आंदोलन झाले नव्हते. शिवसेना पूर्व विधानसभाप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला. शिष्टमंडळात साहेबराव घोडके, राजू खरे, माजी नगरसेवक राजू इंगळे, चंद्रकांत गवई, शिवसेना शहर उपप्रमुख शिवा लुंगारे आदींचा समावेश होता.

फ्री होल्ड सम करण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्रातील अतिरिक्त भाडेपट्टा सरसकट रद्द करावा. पहिला मजला बांधण्यासाठी ७६ हजार रुपये प्रीमियम, हस्तांतरण शुल्क २० ते ६० हजार रुपये घेतले जाते. एकूण रक्कम ३५ हजार असावी. मूळ एफएसआय १.१ मोफत द्यावा. टपरी शॉपलेटला पहिल्या मजल्याची परवानगी द्यावी. धार्मिक स्थळे ट्रस्टला अल्प दरात नियमित करावे. ना हरकत प्रमाणपत्रासाठी स्थळपाहणीची अट रद्द करावी. ना हरकतीच्या फायली मनपाकडे हस्तांतरित कराव्यात. नवी मुंबईच्या घणसोली धर्तीवर नोटरीचे व्यवहार अटी-शर्तीस अधीन राहून नियमित करण्याचीही मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...