आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांत तक्रार:टपरीचालकाच्या घरातून टीव्ही चोरणाऱ्या दोघांना कोठडी ; सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना अटक

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चहा टपरीचालकाच्या घराचे कुलूप तोडून १० हजारांचा टीव्ही पळवणाऱ्या दोघांना मुकुंदवाडी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. बोहरा यांनी दोन्ही आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी केली. सुभाष शंकर शिंदे (४८, रा. मुकुंदनगर) आणि सचिन धनराज शिंदे (३२, रा. स्वराजनगर, मुकुंदवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. स्वराजनगरातील दादाराव संतोष घोडके (३७) यांचे कुटुंबीय २६ ऑक्टोबर रोजी गावी गेले होते. तर घोडके घराला कुलूप लावून चहाच्या टपरीवर गेले होते. दुपारी शेजाऱ्यांनी फोन करून त्यांच्या घरात चोरी झाल्याचे कळवले. त्यांनी येऊन पाहिले तर घरातील टीव्ही चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मुकुंदवाडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना अटक केली.

बातम्या आणखी आहेत...