आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:‘दिव्य मराठी’च्या दिवाळी अंकाला ‘छंदश्री’चे दोन पुरस्कार जाहीर

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दिव्य मराठी’च्या दिवाळी अंकाला छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत दोन विभागांतील पारितोषिके जाहीर झाली आहेत.उत्कृष्ट छायाचित्र या विभागात ‘दिव्य मराठी’ दिवाळी अंक २०२० पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट सामाजिक लेख या विभागातही ‘दिव्य मराठी’ दिवाळी अंकाने पुरस्कार पटकावला. ‘इस्लामोफोबिया नावाचा व्हायरस’ या शीर्षकाचा अक्षय शेलार यांनी लिहिलेला लेख पुरस्कारप्राप्त ठरला.

छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत दिव्य मराठीच्या दिवाळी अंकाला पारितोषिक मिळण्याची ही सलग चौथी वेळ आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांचे दिवाळी अंकांचे निकाल छंदश्रीला जाहीर करता आले नव्हते. गेल्या आठवड्यात हा निकाल जाहीर करण्यात आला. तसेच पुरस्कार वितरण समारंभ माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, डाॅ. सतीश देसाई आणि छंदश्रीचे दिनकर शिलेदार व डाॅ. राहुल शिलेदार यांच्या उपस्थितीत पार पडला.

बातम्या आणखी आहेत...