आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्यांचे दर्शन:अजिंठा लेण्यांमध्ये भल्या पहाटे घुसले दोन बिबटे, कुठलीही हानी नाही; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजेदरम्यान घडली

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांमध्ये बिबटे फिरत असल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. व्हायरल व्हिडियोमधील पहिल्या व्हिडियोमध्ये एक बिबट्या लेण्यांच्या भागात फिरताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडियोत दोन बिबटे इकडून तिकडे उडी मारत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजेदरम्यान घडली असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित घटनेसंदर्भात वनविभाग कळवले गेले नसून हे व्हिडियो नुकतेच व्हायरल झाल्याचे तेथील कर्मचाऱ्याने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

बिबट्यांची संख्या दोन
व्हायरल होत असलेल्या व्हिडियोमधून किती बिबटे फिरत होते यांचा अंदाजा येत नव्हता. परंतु, सदरील घटनेची पुष्टी केल्यानंतर यामध्ये दोन बिबटे फिरत असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले.

पहिल्यांदा घडली घटना
अजिंठाच्या जंगलात वाघ, बिबटे, अस्वल, माकडे मोठ्या प्रमाणात वास्तव करतात. परंतु, यातील वाघ आणि बिबटे लेण्यांच्या दर्शनी भागात शक्यतो आढळून येत नाही. यामुळे कोणालाच इजा पोहोचली नसल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...