आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत कलकत्ता पानाचे शहरातील माेठे व्यापारी:अब्दीमंडीत ओव्हरटेक करताना दाेन कारचा अपघात, व्यापाऱ्याचा मृत्यू

औरंगाबाद | दौलताबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओव्हरटेक करण्याच्या नादात सुसाट कारने शहरातील व्यापाऱ्याच्या कारला धडक दिल्याने दौलताबाद परिसरात मोठा अपघात झाला. यात औरंगाबादसह पाच जिल्ह्यांना कलकत्ता पानाचा पुरवठा करणाऱ्या व्यापारी कुटुंबाचे सदस्य सय्यद इम्रान सय्यद इरफान (४०, रा. सिल्व्हर कॉम्प्लेक्स, जुना बाजार) यांचा पहाटे तीन वाजता मृत्यू झाला तर कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की, इम्रान यांची कार तीन वेळेस उलटून लांब पर्यंत गेली.

सय्यद इम्रान व त्यांचे काही नातेवाईक गुरुवारी रात्री स्कॉर्पिओ कारने (एमएच २० बीसी २४३८) खुलताबादला दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परतत असताना ११.३० वाजता दौलताबाद रस्त्यावरील अब्दीमंडी परिसरात एका वळणावर सुसाट वेगात आलेल्या टोयाटो कारचालकाने (एमएच २० सीएस ४६८६) इम्रान यांच्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यातच इम्रानच्या कारच्या मागील चाकाला त्या कारची धडक बसली व इम्रान यांच्या कारचे चाक निखळून पडले.

चाळीस वर्षांपासून व्यवसाय : इम्रान यांचे आजोबा शहरात कलकत्ता पानाचे मोठे व्यापारी होते. चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून पानाच्या व्यापाऱ्याची परंपरा असलेल्या इम्रान यांचे कुटूंब औरंगाबादसह जालना, बीड, अकोला, खामगाव आदी जिल्ह्यांमध्ये कलकत्ता पानांना पुरवठा करत होते.

कार तीन वेळा उलटून लांबपर्यंत घासत गेली इम्रान यांच्या कारचे चाक निखळल्याने त्यांचा तोल गेला व कार थेट तीन वेळा उलटून लांब पर्यंत गेली. गाडी चालवत असलेल्या इम्रान यांच्यासह त्यांचे भाऊ एहतेशाम सय्यद इरफान (३८), बुशरा अन्वर खान व शिबा अन्वर खान (रा. किराडपुरा) हे जखमी झाले. स्थानिकांनी धाव घेत सर्वांना घाटीत दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना पहाटे तीन वाजता इम्रान यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करून धडक देणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करत दोन्ही कार पोलिसांनी जमा केल्या. सहायक फौजदार डी. बी. तडवी अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...