आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:विहिरीत उडी, गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

बिडकीन3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदवीचे शिक्षण घेणाऱ्या ओंकार नारायण डांगरे (२१, रा. कासार गल्ली, बिडकीन) याने नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ओंकर पाेलिस भरतीची तयारी करत हाेता. मात्र, बुधवारी सकाळी व्हॅट्सअॅपवर - ‘असे वाटते, मी मेलाे तरच सर्व काही व्यवस्थित हाेईल’ असे स्टेटस ठेवून ताे दुचाकीने डीएमआयसीत गेला. मोबाइल बाजूला ठेवून त्याने विहिरीत उडी मारली. ही माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला.

नोकरीच्या आमिषाने १५ लाख रुपये उकळले
नाशिक जिल्ह्यातील पेठ येथे लिपिकाची नाेकरी लावतो, असे सांगून एका व्यक्तीने पंधरा लाख रुपये उकळून फसवणूक केल्याने तणावाखाली गेलेल्या शुभम बळीराम पवार (२३, रा. बीड बायपास) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.शुभम सध्या कोपरगाव येथील एका महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण घेत होता. नोकरीसाठी त्याने वडिलांकडून पंधरा लाख रुपये घेऊन एका व्यक्तीला दिले होते.

बातम्या आणखी आहेत...