आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथे शेतात कडबाकुट्टी मशीनच्या वायरचा शॉक लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन रामकीसन घोडे 23 व पवन गजानन घोडे वय 23 असे मृत तरुणांचे नावे आहेत. ही दुर्घटना मंगळवार दिनांक 7 रोजी दुपारी 12 वाजे दरम्यान लिंगेवाडी येथील घोडे वस्तीवर राहणाऱ्या रामकीसन घोडे यांच्या शेतातील घरासमोर घडली.
दरम्यान, भोकरदन शहरासह परिसरात लिंगेवाडी येथे सकाळ पासून संततधार पाऊस सुरू होता. दुपारी 12 वाजे दरम्यान पाऊस उघडल्यावर शेतात बैलासाठी कडबा कुट्टी मशीन सुरू करण्यासाठी पवन व सचिन गेला. दरम्यान, त्यांना मशीन व वायरमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा जोरदार धक्का बसला त्यामुळे ते गंभीर होऊन जागीच मृत्यू झाला. उपस्थित असलेल्या मंडळींनी तात्काळ वीज पुरवठा खंडीत करून दोघांना त्वरित भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, तपासादरम्यान डॉ. मेहत्रे यांनी सदरील तरुणाला मृत घोषित केले.
डॉक्टरांनी शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेमुळे घोडे परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला असून लिंगेवाडी गावावर परिसरात शोककळा पसरली आहे. यातील मृत तरुण पवन यांच्या पश्चात वडील आई व दोन भाऊ आहे तर सचिन च्या पश्चात वडील आई एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.