आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:पोहण्यास गेलेल्या सख्या चुलत भावांचा बूडून मृत्यू, जिंतूर तालुक्यातील वझर येथील दुर्घटना

परभणी2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

गावालगत असलेल्या धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या चुलत भावांचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी(दि.1) सकाळी 7 च्या सुमारास घडली. श्रीओम ज्ञानेश्‍वर पजई(वय18) व महेश भानुदास पजई(वय16) अशी मृत्यू पावलेल्या भावडयांची नावे आहेत.

बामणी पोलिस ठाण्यातंर्गत वझर या गावातील पजई कुटुंबातील चुलत भाऊ सोमवारी सकाळी गावालगत असलेल्या धरणाजवळील पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. इयत्ता बारावीत असलेला श्रीओम व अकरावीत शिक्षण घेत असलेला महेश हे दोघे पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. ते पाण्यात बुडाले. ही बाब काही जणांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांना पाण्याबाहेर काढले आणि लगेचच वझर येथील आरोग्य केंद्रात नेले. परंतू तेथे आरोग्य अधिकारी, नसल्याने त्यांना तातडीने खासगी वाहनाद्वारे जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात आणले. परंतू तेथे आणण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. त्या दोघांचे शवविच्छेदन जिंतूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मात्र, याप्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती.या घटनेने वझर ग्रामस्थांवर शोककळा पसरली. 

बातम्या आणखी आहेत...