आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटाच्या समर्थकावर बलात्काराचा गुन्हा:विवाहितेला लग्न करण्याचे आमिष दाखवून दोन कोटी रुपये उकळले

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वाश्रमीचा युवा सेनेचा शहरप्रमुख व सध्याचा शिंदे गटाचा कट्टर समर्थक जोतिराम विठ्ठल धोंगडे पाटील याने विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तसेच पीडितेकडून दोन कोटी रुपये उकळले. ती गर्भवती राहताच गर्भपात करून बंदूक रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडितेने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बलात्कार, खुनाचा प्रयत्न, गर्भपात करण्यासह सात कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडितेच्या तक्रारीनुसार जोतिराम पाण्याच्या टँकरचा व्यवसाय करतो. त्यातून त्याची पीडितेसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले व भेटीगाठी वाढल्या. त्यातच पीडिता कौटुंबिक कलहात असल्याने जोतिरामने त्याचा फायदा घेत २०१९ पासून तिला लग्नाचे आमिष दाखवून विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये नेत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. खासगी क्षणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याआधारे ब्लॅकमेल करून त्याने तिच्याकडून सातत्याने पैसे उकळण्यास सुरुवात केली. या दरम्यान ती गर्भवती राहिली. त्यानंतर जोतिरामने गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. २ मार्च रोजी गर्भवती असतानाच त्याने मारहाण केल्याने दुसऱ्यांदा गर्भपात झाला. परंतु, मी राजकारणात आहे, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे सांगून त्याने लग्नास नकार दिला. जोतिरामकडून मला मुलगी झाल्याचा दावा पीडितेने तक्रारीत केली आहे. तिने पहिल्या पतीपासून घटस्फोटही घेतला आहे. १० सप्टेंबर राेजी पीडितेने त्याला कॅनॉट परिसरात भेटण्याचा प्रयत्न केला असता त्याने बंदूक रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने मुकुंदवाडी ठाण्यात जाऊन निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्याकडे तक्रार दिली.

बड्या पाेलिस अधिकाऱ्यांसाेबत वावर : नुकत्याच झालेल्या गणपती महोत्सवात अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत जोतिरामचा वावर पाहायला मिळाला. सेनेत फूट पडल्यानंतर मोठ्या नेत्यांसह त्याने शिंदे गटात प्रवेश केला. क्रांती चौकात मुख्यमंत्र्यांच्या सत्कारात तो अग्रणी होता. स्वत:चा युवा मंच असल्याने ताे सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात राहायचा. ऐन मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या चोवीस तास आधीच जोतिरामवर गंभीर गुन्हे दाखल झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

राेख तीन लाख रुपये घेतले, दोन नव्या कारचे हप्ते भरायला लावले जोतिरामने माझ्याकडून सुरुवातीला ३ लाख रुपये घेतले. त्यानंतर महागडे मोबाइल व ३५ लाखांचे दागिने घेतले. ब्रेझा व स्कॉर्पिओ गाडी घेऊन हप्ते भरण्यास सांगितले. क्रेडिट कार्डचे हप्तेदेखील भरायला लावले. मला वारंवार ब्लॅकमेल करून जवळपास दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...