आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन कोटी रुपयांचे कॉपर स्क्रॅप घेऊन जाणारा ट्रक (जीजे १० झेड ७७९२) चाळीसगाव जवळील कन्नड घाटात ६ संशयितांनी रविवारी दुपारी दीड वाजता पळवून नेला. संशयितांनी ट्रकचालकाला मारहाण करून हातपाय दोराने बांधून ट्रकमध्येच कोंबले व ट्रक पळवला.याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तो चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. ट्रकचालक लखिंदर जोधू बोरा (३०, रा. गुमिनीपुंडी, तिरुवलूर, तामिळनाडू) यांनी पोलिसात तक्रार दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.