आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:राज्यात दोन दिवस पावसाचा अंदाज, नंतर पुन्हा खंड पडणार; 17-18 रोजी मध्यम ते जोरदार पाऊस

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्टमध्ये राज्याकडे पाठ फिरवलेला पाऊस या आठवड्यात काही प्रमाणात बरसण्याची शक्यता असून त्यानंतर पावसात पुन्हा खंड पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात १७ व १८ ऑगस्ट रोजी सर्वत्र मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे राज्यात १७ व १८ ऑगस्ट हे दोन दिवस सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी (१७ आॅगस्ट) पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड. हिंगोली, नांदेड. लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, वाशीम या जिल्ह्यांसाठी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

बुधवारी (१८ ऑगस्ट) पावसाचा जोर अधिक राहील. बुधवारी नाशिक, पुणे, कोल्हापूर. सातारा, औरंगाबाद, जालना, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या मान्सूनचा आस अद्यापही हिमालयाच्या पायथ्याशी आहे. राज्यात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती नाही, त्यामुळे १८ ऑगस्टनंतर पावसात पुन्हा खंड पडण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...