आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:राज्यात दोन दिवस पावसाचे; उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासाठी यलो अलर्ट जारी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात दोन दिवसांत बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. २१ व २२ सप्टेंबर या काळात कोकणासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या पूर्व राजस्थान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र असून मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडील जैसलमेर ते पूर्वेकडील डाल्टनगंजपर्यंत सक्रिय आहे. पश्चिम बंगालच्या गंगेच्या मैदान परिसरावर तसेच तामिळनाडूच्या किनाऱ्यावर चक्रीय चक्रावात आहे. दक्षिण कर्नाटक ते कामोरीन असा कमी दाबाचा पट्टा आहे. राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती असून विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.

27 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
कुलाबा वेधशाळेने २१ व २२ सप्टेंबर या दोन दिवसांसाठी राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यात कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...