आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:राज्यात आता दोन दिवस पावसाचे; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुलाब चक्रीवादळाचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले असून ते दक्षिण ओडिशा व लगतच्या दक्षिण छत्तीसगडवर आहे. तसेच उत्तर कोकण ते दक्षिण ओडिशा असा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी २८ व २९ हे दोन दिवस राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनुसार गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मंगळवारी व बुधवारी जाेरदार पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा
{ २८ सप्टेंबर : धुळे, जळगाव, नाशिक,पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा (२०४.५ मिमीपेक्षा जास्त) रेड अलर्ट तर मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा (११५.५ ते २०४.५ मिमीपर्यंत) ऑरेंज अलर्ट. तसेच बुलडाणा, वाशीम, अमरावती, अकोला, उस्मानाबाद. लातूर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (६४.५ ते ११५.५ मिमीपर्यंत पाऊस) जारी करण्यात आला आहे.

२९ सप्टेंबर : धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर हिंगोली, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...