आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामद्यधुंद अवस्थेत गाडीत धारधार काेयता बाळगून भर रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या दोन तरुणांना गुन्हे शाखेने अटक करुन सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रशांत मधुकर गोटे (सारसनगर, अहमदनगर) व विक्की शशिकांत गायकवाड (रा. सावेडी, अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत. हा प्रकार ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री वाल्मीसमोर घडला.
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गजानन सोनटक्के पथकासह सोमवारी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी वाल्मी संस्थेसमोर विनाक्रमांकाची बोलेरो गाडी उभे करुन दोन तरुण धिंगाणा घालत होते. दारु रिचवलेल्या दोघांना विचारपूस केली असता, त्यांनी पोलिसांसोबत हुज्जतबाजी केली. आरडाओरड सुरू केल्याने सोनटक्के यांनी कागदपत्रे मागितले असता ते देखील त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्या गाडीत साडेआठ हजार रोख रक्कम व त्याच पिशवीत १२.५ इंचाचा काेयता आढळून आला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेत सर्व ऐवज जप्त करुन सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले. अंमलदार संदीप बीडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.