आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:बजाजनगरातील लसीकरण केंद्रावर रांगेत ढकलाढकली, दोन वृद्ध किरकोळ जखमी

वाळूज25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडगाव येथील नागरिकांनी बजाजनगर केंद्रावर सकाळी सहा वाजेपासून रांगा लावल्या

बजाजनगर येथील आराेग्य केंद्रात साेमवारी सकाळी सुरू असलेल्या लसीकरणात माेठा गाेंधळ उडाला. रांगेत ढकलाढकली हाेऊन अनेक जण खाली पडले. यात दाेन वृद्ध किरकाेळ जखमी झाले. अखेर पाेलिसांनी धाव घेत गर्दी पांगवली. दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बजाजनगरातील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत लसीकरण सुरू अाहे. सोमवारी लसींचा तुटवडा असल्याने वडगाव येथील केंद्रात लसीकरण बंद ठेवून पंढरपूर व बजाजनगर येथील केंद्रावर सुरू ठेवले. त्यामुळे वडगाव येथील नागरिकांनी बजाजनगर केंद्रावर सकाळी सहा वाजेपासून रांगा लावल्या. सकाळी दहा वाजेच्या सुमारास लसीकरणाला सुरुवात होणे अपेक्षित हाेते.

मात्र, गर्दी पाहून वाळूज एमआयडीसी पोलिसांना मदतीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामने यांनी कुपन वाटप करण्यास सुरुवात करताच लाेकांनी धक्काबुक्की करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही जण खाली पडले. यात दाेन वृद्धांना किरकाेळ दुखापत झाली. गोंधळानंतर आज लसीकरण हाेणार नाही, सर्वांनी घरी निघून जावे. ४५ वर्षांवरील लाेकांनी बजाजनगर आरोग्य केंद्रात येऊन लस घ्यावी, असे डॉ. बामने यांनी सुनावले. त्यानंतर अनेक जण घरी निघून गेले.

बातम्या आणखी आहेत...