आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलशुद्धीकरण केंद्र:पंपहाऊसमध्ये दोन वेळा बिघाड; होळीच्या दिवशी 4 तास उशिराने झाला पाणीपुरवठा

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फारोळा येथील पंपहाऊसच्या ट्रान्सफाॅर्मरमध्ये सोमवारी दोन वेळा बिघाड झाला. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दीड तास खंडित झाल्याने निर्धारित वेळेपेक्षा चार-पाच तास उशिराने पाणी आले. ऐन होळीच्या दिवशी सकाळी अकरा वाजेनंतर बहुतांश भागात पाणीपुरवठाच झाला नाही, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात सकाळी ११.३० वाजता बिघाड झाला आणि संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. दुरुस्तीचे काम हाती घेऊन १२.१० वाजता पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. त्याची दुरुस्ती ३.४० वाजता झाली. परिणामी शहरातील अनेक भागांत चार ते पाच तास उशिराने पाणीपुरवठा झाला. काही भागात साेमवार ऐवजी मंगळवारी पाणीपुरवठा होईल.

बातम्या आणखी आहेत...