आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिकलठाणा एमआयडीसी येथील सेंट्रल इंस्टिट्युट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये (सिपेट) विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. 330 प्रवेश क्षमता असलेल्या या संस्थेतील रिक्त जागांवर सध्या स्पॉट अॅडमिशन सुरू आहे. 100 टक्के रोजगार देणाऱ्या या संस्थेत दहावीनंतर दोन तर बीएस्सी आणि पॉलिटेक्निकनंतर प्रत्येकी एक कोर्स आहे. प्लॅस्टिक तंत्रज्ञानात अभियंता होऊ इच्छिणारे विद्यार्थी 22 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात.
प्लॅस्टिक निर्मिती, प्लॅस्टिक डिझाईन, प्लॅस्टिक तंत्रज्ञानात निपूण करणाऱ्या देशात 35 शासकीय सिपेट संस्था आहेत. सिपेट केंद्र सरकारचा उपक्रम आहे. जळगाव रोडवरील डॉ. आंबेडकरनगरच्या मागील बाजूला चिकलठाणा एमआयडीसीमध्ये सिपेट संस्था आहे. चारही अभ्यासक्रमांसाठी देशातील 35 सिपेट संस्थांनी घेतलेल्या संयुक्त सीईटीमार्फत प्रवेश प्रक्रिया राबवली गेली आहे. जुलै महिन्यात जवळपास पन्नास टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत. आता रिक्त जगांवर स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी आहे. त्यासाठी डॉ. मिलिंदकुमार भरणे (9325687902) आणि सतीश सूर्यवंशी (9373687915) यांच्या मोबाईलवर इच्छुक विद्यार्थी संपर्क करू शकतात.
1. डिप्लोमा इन प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी :
एकूण जागा-120, कालावधी-3 वर्ष (6 सत्र), निकष : दहावी उत्तीर्ण
शैक्षणिक शुल्क : दरवर्षी 36 हजार 500
2. डिल्पोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी
एकूण जागा : 120, कालावधी 3 वर्ष ( 6 सत्र)
निकष : दहावी उत्तीर्ण
शैक्षणिक शुल्क : दरवर्षी 36 हजार
3. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लॅस्टिक प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी
एकूण जागा-60, कालावधी 2 वर्ष (4 सत्र)
निकष : बीएस्सी, शैक्षणिक शुल्क : दरवर्षी 45 हजार
4. पोस्ट डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड डिझाईन
एकूण जागा : 30 कालावधी दीड वर्ष (3 सत्र)
निकष : पॉलिटेक्निकचा डिप्लोमा शैक्षणिक शुल्क : पहिले वर्ष 45 हजार, दुसरे वर्ष 21 हजार
100 टक्के रोजगार देणारा कोर्स
या संस्थेतून डिप्लोमा केलेले विद्यार्थी प्लॅस्टिक इंडस्ट्रिजमध्ये नोकरी करू शकतात. शंभर टक्के रोजगार देणारा हा कोर्स आहे. पेट्रोकेमिकल, प्लॅस्टिकच्या क्षेत्रातील हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्याला थेट बीटेक द्वितीय वर्षालाही प्रवेश घेता येतो. संस्थेत सामाजिक आरक्षणाचे तंतोतंत पालन केले जाते- प्रा. मिलिंद भरणे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.