आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:रोहिदासपुऱ्यात होळीपूजनात दोन गट समोरासमोर भिडले, परस्परविरोधी तक्रारीनंतर 18 जणांवर गुन्हा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक होळी पूजन कार्यक्रमात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यानंतर दोन्ही गटांच्या लोकांनी तक्रारी दिल्याने १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

फकीरचंद रामचंद्र टेरकिये (५५, रा. रोहिदासपुरा, जुना मोंढा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ मार्च रोजी चर्मकार समाजाच्या वतीने सार्वजनिक होळी पूजेसाठी शीतलामाता (मरिमाता) मंदिरासमोर जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता. रात्री दहाच्या सुमारास टेरकिये यांचे जेवण झाल्यानंतर ते ताट फेकण्यासाठी जात असताना रतन भंगीलाल कस्तुरे, मयूर चौधरी, राजेश रामचंद्र चौधरी, वसंत चौधरी, प्रल्हाद चौधरी, आकाश चौधरी, कन्हैया बित्तुलाल कस्तुरे, आरती रतन कस्तुरे, काशीबाई प्रल्हाद चौधरी, राधा लखन कस्तुरे, राजु रामचंद्र चौधरी, जय प्रल्हाद चौधरी, धनराज मनिराम चौधरी, विजय हिरालाल कस्तुरे, सतीश कन्हैयालाल कस्तुरे, धीरज ललित चौधरी, गौतम ललीत चौधरी, ललीत लालमन चौधरी (सर्व रा. रोहिदासपुरा, जुना मोंढा) यांच्यात वाद झाला. त्यामुळे टेरकिये यांचे नातेवाईक व रतन कस्तुरे यांचे नातेवाईक जमा झाले. त्यानंतर वरील लोकांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

दुसऱ्या गटातील वसंत तुळशीराम चौधरी (३६, रा. राेहिदासपुरा, जुना मोंढा) यांच्या तक्रारीवरून गौतम टेरकिये, गोविंद टेरकिये, राज टेरकिये, रवी टेरकिये, काशीबाई संतोष टेरकिये, राणी पांडुरंग कस्तुरे, कांताबाई गोपाल कस्तुरे, गणेश टेरकिये, विशाल टेरकिये, लालचंद टेरकिये, खेमंचंद टेरकिये, प्रल्हाद रामचंद्र चौधरी, राजू चौधरी, राजेश चौधरी, आरती रतन कस्तुरे, रुख्मणी प्रल्हाद चौधरी, राणी कपिल यांच्यावर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...