आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडण:नव्या सिमेंटच्या रस्त्यावरून ट्रक नेल्याने दोन गट भिडले ; पाच जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या सिमेंटच्या रस्त्यावरून ट्रक नेल्याने वाद होऊन दोन गट आपसात भिडल्याची घटना न्यू पहाडसिंगपुऱ्यात सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी धाव घेत जमावाला पांगवले. त्यानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगमपुरा पोलिसांचे कर्मचारी सोमवारी रात्री गस्तीवर होते. साडेअकरा वाजता त्यांना न्यू पहाडसिंगपुरा परिसरात भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिस तेथे पोहोचल्यावर नवीन सिमेंटच्या रस्त्यावरुन ट्रक नेल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू होती. पोलिसांनी वाद सोडवून काहींना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस नाईक संजय ठाकूर यांच्या फिर्यादीवरून अनिक रफियाेद्दीन पटेल (३८), शेख आबेज शेख युसूफ (३०), मोहंमद रईस मोहंमद याकूब(३४), सुनिल सुंदरलाल बागवाले (४८), आदित्य धर्मराज बागवाले (१९) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...