आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद:सिल्लोडमध्ये जिल्हा परिषदेचे दोन गट वाढले; इतर तालुक्यांत एक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट व गणांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गटांची संख्या आता ७०, तर पंचायत समितीच्या गणांची संख्या १४० झाली आहे. पूर्वी ही संख्या अनुक्रमे ६२ व १२४ होती. वाढलेल्या आठपैकी दोन सिल्लोड तालुक्यांतील आहेत. तर औरंगाबाद, गंगापूर, कन्नड, फुलंब्री, पैठण, वैजापूर तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढला. खुलताबाद व सोयगाव तालुक्यात मात्र एकही गट वाढलेला नाही. अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले, विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर जिल्हा परिषदेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला आहे. त्यावर २ जून ते ८ जूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती, आक्षेप नोंदवता येतील. २२ जूनपर्यंत प्राप्त हरकती- आक्षेपांवर सुनावणी पूर्ण होईल. त्यानंतर २७ जून रोजी गट व गण रचना अंतिम करून शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...