आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली कोरोना:हिंगोलीच्या राखीव दलातील दोन जवानांचा कोरोनावर विजय, टाळ्यांच्या गजरात शासकिय रुग्णालयातून सुट्टी

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 6 जवानांना सर्दी, ताप येत असल्याने त्यांना शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील ६ पैकी २ जवानांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. त्यांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आल्यानंतर शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी टाळ्यांच्या गजरात त्यांची रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे हिंगोलीकरांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

हिंगोलीच्या राज्य राखीव दलाची एक कंपनी (ता. १९) एप्रील रोजी बंदोबस्तावरून हिंगोलीत परत आली होती. यामध्ये ६ जवानांना सर्दी, ताप येत असल्याने त्यांना शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल ता. २१ एप्रील रोजी पॉझीटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर मागील दोन दिवसांत त्यांचे दोन वेळेस स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी २ जवानांचे स्वॅब नमुने निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना सायंकाळी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, राखीव दलाचे समादेश मंचक इप्पर, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. संजीवन लखमावार, डॉ. अरुण जिरवणकर, डॉ. नारायण भालेराव यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तर  ४ जवानांचा पहिला अहवाल पॉझीटीव्ह आल्यामुळे पुढील सात दिवसानंतर त्यांची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आता हिंगोलीच्या आयसोलेशन वॉर्डमधून कोरोनावर विजय मिळवत जवानांची घरी रवानगी होण्यास सुरवात झाल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...