आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:दोनशे पोलिसांनी केला अन्न नासाडी न करण्याचा संकल्प

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न वाचवा समितीच्या वतीने अन्न नासाडी थांबवण्यावर ८ वर्षांपासून जनजागृती केली जाते. आता शहरातील पोलिसही या अभियानात सहभागी झाले आहेत. नुकतेच २०० पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ‘अन्न नासाडी होऊ देणार नाही’ अशी शपथ घेतली आहे. अन्न वाचवा समितीचे अध्यक्ष अनंत मोताळे यांच्यासह संपूर्ण टीम शहरातील विविध सार्वजनिक कार्यक्रम आणि कार्यालयात जाऊन जनजागृती करते.

यामध्ये अन्न नासाडीमुळे होणारे दुष्परिणाम तसेच अन्न न मिळाल्याने भूकमारीतून होणारे मृत्यू यांची आकडेवारी उपस्थितांपुढे मांडली जाते. अन्न पिकवण्यासाठी शेतकरी करत असलेल्या मेहनतीची जाणीवही त्यांना करुन दिली जाते. कृषिप्रधान महाराष्ट्रातील जनतेला अन्न नासाडी परवडणारी नाही, याची जाणीव या सादरीकरणातून होते. अभियानाला शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध कार्यालयांतील कर्मचारी जोडले जात आहेत. या कार्यक्रमांत अन्न वाचवा समितीचे राजेंद्र वाहुळे, पूजा सोनवणे, सरिता घोडतुरे, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, नितीन मोरे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...