आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी:महसूलच्या पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यातल्या महसूलच्या 175 कर्मचाऱ्यांना शासनाच्या आश्वासीत पदोन्नतीसाठीचा लाभ मिळाला आहे. अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी या ऑर्डर काढल्या आहेत.त्यामुळे जे अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र होते मात्र त्यांना जागा नसल्यामुळे पदोन्नती मिळत नव्हती त्यांना या आश्वासीत प्रगती योजनेमुळे लाभ होणार आहे. याबाबत तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांचे आभार मानले आहेत. यामध्ये कारकुन तलाठी मंडळअधिकारी टंकलेखक यासह विवीध अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

याबाबत सुर्यवंशी यांनी सांगितले की शासकीय सेवेत दहा वर्ष 20 वर्ष आणि 30 वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांना पदोन्नती देण्यात येते. मात्र दहा वर्ष काम केल्यानंतर पदोन्नती देण्यासाठी ती जागा उपलब्ध नसल्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर अन्याय होत होता. मात्र आता दहा वर्ष झाल्यानंतर त्याला पदोन्नती देवून त्या संबधीत पदाचे वेतन देण्यात येत आहे. तलाठीला दहा वर्ष काम केल्यानंतर मंडळ अधिकारीचे प्रमोशन मिळते.मात्र मंडळ अधिकाऱ्यांची जागा रिक्त नसल्यामुळे त्यांची अडचण होते. त्यामुळे आता त्या व्यक्तीला मंडळ अधिकाऱ्यांचा दर्जा आणि वेतन प्राप्त होईल. ज्यावेळी जागा रिक्त होईल तेव्हा त्या जागेवर त्यांची नियुक्ती होईल. यामध्ये तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची संध्या 80 इतकी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या या ऑर्डरमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वाढले असून कर्मचाऱ्यात उत्साहाचे वातावरण आहे.

बातम्या आणखी आहेत...