आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमृद्धी महामार्गाने शिर्डीहून नागपूरकडे जाणारा मालवाहतूक ट्रक शुक्रवारी मध्यरात्री पुलाचा कठडा तोडून खाली २५ फूट कोसळल्याची घटना फतियाबादजवळच्या गोकुळवाडी येथे घडली. त्यात ट्रकचालक सोहेल खान (२३) आणि क्लिनर नौशाद खान (२२) या दोघांचा होरपळून मृत्यू झाला.
छत्तीसगड येथून रबर, केमिकल, प्लास्टिकचे पाइप व इतर साहित्य घेऊन सोहेल व नौशाद हे दोघे निघाले होते. शुक्रवारी त्यांचा ट्रक (सीजी ०७, एडब्ल्यू ०५१८०) फतियाबादजवळच्या गोकुळवाडी पुलावर येताच चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजक तोडून २५ फूट खोल पुलाखालील रस्त्यावर कोसळला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मनपाच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावले. जवानांनी आग विझविली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.