आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अपघात:हिंगोली- कनेरगाव मार्गावर भरधाव जीपची दुचाकीस धडक, एक ठार दोन जखमी

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर बोलोरो जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. २२) दुपारी घडली आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथून ज्ञानेश्वर रमेश पडघान ( ३०),  शिवाजी मल्हारी बोडके, व मनोहर देवराव बोडके हे तिघे जण त्यांच्या दुचाकी वाहनावर दुपारच्या सुमारास फाळेगाव कडे निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन कनेरगाव पासून तीन किलोमीटर अंतरावर आले असताना हिंगोली कडून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलोरो जीपने त्यांच्या दुचाकी वाहनास धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील ज्ञानेश्वर पडघान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर शिवाजी बोडके व मनोहर बोडके हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच कनेरगाव नाका पोलीस चौकीचे उपनिरीक्षक गजानन पाटील, एम. के. नंदे, जमादार विजय महल्ले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी तातडीने हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे. या अपघातानंतर बोलेरो जीप चालकाने जीप घटनास्थळी सोडून पळ काढला याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.