आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:दुगड पेट्रोल पंपाजवळ पुन्हा भीषण अपघात;दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन ठार ,दोन गंभीर जखमी

माजलगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव परभणी मार्गावरील घळाटवाडी फाट्यावरील दुगड पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकींची सामोरा समोर धडक होवुन झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर अन्य दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवार ३० जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी सात वाजता घडला. दुगड पेट्रोल पंपाच्या समोरील परिसर अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे.

येथील जयमहेश साखर कारखान्यावर वाहनाचे नियोजन लावून शुभम अनंता सुरवसे (वय २४ रा देवगाव ता. वडवणी) हा तरूण दुचाकीवरून रस्त्याने येत होता आणि गणेश गुलाबराव झेंटे (वय २१ वर्ष रा. घळाटवाडी) याच्या सोबत पांडुरंग विष्णू शिंदे व त्याची बहीण कविता सूर्यकांत नरवडे हे दुसऱ्या दुचाकीवरून एम.एच. ४४ व्ही. ६१८२ वरून दुगड पंपाकडे येत होते. यावेळी दोन्ही दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात दुचाकी चालवत असलेला शुभम सुरवसे आणि गणेश झेंटे हे जागीच ठार झाले तर गणेश झेंटे याच्या दुचाकीवर असलेले पांडुरंग शिंदे आणि कविता कविता नरवडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी बीडला हलवण्यात आले आहे . अपघातस्थळावरून मयतांना रूग्णालयात महामार्ग पेट्रोल टीमचे किशोर झगडे , प्रदीप भालेराव , अभिजित अलझेंडे यांनी नेले.

अपघात प्रवण क्षेत्रावर यापूर्वी पाच बळी

काही दिवसांपूर्वीच दुगड पंपाच्या समोर उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन पन्नास मेंढ्या दगावल्या होत्या मागील वर्षीत सुमार चार ते पाच जणांचा बळी गेलेला आहे त्यामुळे महामार्ग देखरेख करणाऱ्या एल.टी. कंपनीने या क्षेत्रास अपघात प्रवण क्षेत्र घोषित करून या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी होत आहे.