आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणीअंती आरोप सिद्ध:धनादेश अनादरप्रकरणी दोन लाखांवर भरपाईचे आदेश

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनादेश अनादरप्रकरणी आरोपी शशिकांत सोनवणे याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.एच. शाहिद यांनी ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीने तक्रारदार नारायण आल्हाड यांना एक महिन्यात २ लाख ७ हजार ५४० रुपये नुकसान भरपाई द्यावी अन्यथा ३ महिने कारावास भोगावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे.

तक्रारदाराने मुलाच्या प्रवेशासाठी २ लाख रुपये कपाटात ठेवले होते. ते पैसे चोरी झाले होते. आरोपीच्या मुलाने तक्रारदाराच्या घरातून ते पैसे चोरल्याची कबुली दिली होती. तक्रारदाराने ते पैसे परत करण्याची विनंती केली. नसता तक्रार दाखल करील, असे बजावले. त्यावर काही प्रतिष्ठित व्यक्तींनी मध्यस्थी केली असता आरोपीने एक लाख ८० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. या तडजोडीच्या रकमेपोटी दिलेला धनादेश अनादरित झाल्यामुळे तक्रारदाराने न्यायालयात तक्रार दिली होती. सुनावणीअंती आरोप सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा व नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. अंजली मोरे व ॲड. अंकुश जाधव यांनी काम पाहिले.